वणीच्या पंचायत समितीला भीषण आग
जिल्ह्यातील वणीमध्ये पंचायत समितीच्या एका कक्षाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र महत्त्वाचे कागदपत्र जळून खाक झाले आहेत.
यवतमाळ : जिल्ह्यातील वणीमध्ये पंचायत समितीच्या एका कक्षाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र महत्त्वाचे कागदपत्र जळून खाक झाले आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समोर आलेले नाही. मात्र आग शॉर्टसर्कीटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Latest Videos