दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केलं मतदान

दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केलं मतदान

| Updated on: Apr 26, 2024 | 1:31 PM

महाराष्ट्रात बुलढाणा, अकोला, वर्धा, अमरावती, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी अशा ८ मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू..... कुठे नवरदेवाने लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदान केले तर एका मतदाराने थेट आपल्या सोबत मतदान करण्यासाठी तीन महिन्याचं माकडचं कडेवर आणले

महाराष्ट्रात बुलढाणा, अकोला, वर्धा, अमरावती, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी अशा ८ मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. सकाळी सात वाजल्यापासून दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली असून कुठे उत्साहात सुरूवात झाली तर काही ठिकाणी मतदानाचा निरुत्साह देखील पाहायला मिळाला. अशातच एका मतदारसंघाची चांगलीच चर्चा होताना पाहायला मिळत आहे. कारणही तसंच काहिसं भन्नाट आहे. वर्ध्यातील मतदान केंद्रावर एक अनोखा मतदार पाहायला मिळाला. वर्धा लोकसभा मतदारसंघात मतदानाचा चांगला उत्साह असून मोठ्या संख्येने मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. कुठे नवरदेवाने लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदान केले तर एका मतदाराने थेट आपल्या सोबत मतदान करण्यासाठी तीन महिन्याचं माकडचं कडेवर आणले. त्यामुळे मतदान केंद्रात एक वेगळंच वातावरण पाहायला मिळालं.

Published on: Apr 26, 2024 01:31 PM