कराळे मास्तरांना पवारांकडून मिळणार तिकीट? वर्ध्यात भाजपच्या तडस यांच्याविरोधात लढणार निवडणूक?
आपल्या गावरान स्टाईलने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणारे कराळे मास्तर आणि फेमस युट्यूबर थेट लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. नितेश कराळे यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली आणि राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढण्याची मागणी केली.
मुंबई, २१ मार्च २०२४ : वऱ्हाडी भाषेतून शिक्षणाचे धडे देणारे कराळे मास्तर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. लोकसभा लढणव्यासाठी कराळे मास्तर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट मिळवण्याचे प्रयत्न केलेत. तर पुण्यात कराळे मास्तर यांनी शरद पवार यांची भेटही घेतली. आपल्या गावरान स्टाईलने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणारे कराळे मास्तर आणि फेमस युट्यूबर थेट लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. नितेश कराळे यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेत वर्ध्यातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढण्याची मागणी केली. यापूर्वी सुद्धा शरद पवार यांच्यासोबत भेट झाली होती. तर शरद पवार यांच्या सोबत झालेली भेट ही सकारात्मक असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. वर्धा येथे भाजपकडून रामदास तडस हे विद्यमान खासदार आहेत. आणि त्यांनाच भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात शरद पवार गटातील उमेदवाराचा सामना रंगणार आहे.