नागपूरमधील रेल रोकोला यश, हिंगणघाट स्थानकात थांबणार ‘या’ तीन एक्स्प्रेस
VIDEO | हिंगणघाटकरांची रेल्वे थांब्याची मागणी पूर्ण, कोरोनात बंद झालेल्या 'या' गाड्यांचा थांबा पूर्ववत
वर्धा : कोरोना काळापासून वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट रेल्वे थांबा बंद करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर, आता पुन्हा हिंगणघाट शहरांमध्ये तीन रेल्वे गाड्यांचे थांबे पूर्ववत सुरू करण्यात आले आहेत. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अतुल वांदिले यांनी रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले होते आणि यावेळी रेल रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. हिंगणघाट रेल्वे स्थानकावर कोरोनाच्या आधी अनेक रेल्वे गाड्यांचे थांबे होते. परंतु कोरोनाच्या महामारीने देशभरातील सर्वच थांबे बंद करण्यात आले होते. कोरोनाचा काळ संपल्यावर सर्व रेल्वे स्थानकावरील रेल्वे थांबे पूर्ववत सुरू झाले मात्र हिंगणघाट रेल्वे स्थानकाचा थांबा पूर्ववत करण्यात आला नव्हता. हिंगणघाट रेल्वे स्थानकावर अनेक सुपरफास्ट गाड्यांचे थांबे द्यावे, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अतुल वांदिले यांनी प्रशासनाला निवेदन देत रेल्वेचे थांबे न दिल्यास रेल्वे पटरीवर उतरून रेल्वे थांबविण्याच्या आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेत हिंगणघाट स्थानकात चेन्नई- कंत्रा एक्सप्रेस, चेन्नई- जयपूर एक्सप्रेस, गोरखपूर एक्सप्रेसला तात्काळ थांबे देण्यात आलेय. त्यामुळे हिंगणघाटकरांची रेल्वे थांब्याची मागणी पूर्ण झाल्याचे म्हटले जात आहे.