Ladki Bahin Yojana 2024 : माऊली सरकारचे वारकरी महिलांनी मानले आभार, 'लाडकी बहीण' योजनेबद्दल म्हणाल्या...

Ladki Bahin Yojana 2024 : माऊली सरकारचे वारकरी महिलांनी मानले आभार, ‘लाडकी बहीण’ योजनेबद्दल म्हणाल्या…

| Updated on: Jul 03, 2024 | 5:59 PM

, राज्यात सध्या आषाढी वारी करता वारकरी महिला या वारीमध्ये सहभागी आहेत त्यामुळे पात्र असणाऱ्या महिलांना या योजनेचा अर्ज करता येणं शक्य नव्हतं. मात्र मुदतवाढीच्या मागणीनंतर वारकरी महिलांना देखील या योजनेकरता अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे राज्यातील वारीमध्ये सहभागी असलेल्या महिलांनी सरकारचे आभार मानले आहेत.

राज्य सरकारने लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी जाहीर केली. या योजनेतंर्गत सरकार महिलांच्या खात्यात थेट दीड हजार रूपये पाठवणार आहे. या योजनेचा लाभ मिळाला यासाठी 15 जुलै ही अंतिम तारीख होती. मात्र महिलांकडून होणारी मागणी लक्षात घेता या योजनेत मुदतवाढ देण्यात आली असून आता 31 ऑगस्ट पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे. तर 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 01 जुलैपासून दर माह 1500/- रूपये आर्थिक लाभ मिळणार आहे. दरम्यान, राज्यात सध्या आषाढी वारी करता वारकरी महिला या वारीमध्ये सहभागी आहेत त्यामुळे पात्र असणाऱ्या महिलांना या योजनेचा अर्ज करता येणं शक्य नव्हतं. मात्र मुदतवाढीच्या मागणीनंतर वारकरी महिलांना देखील या योजनेकरता अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे वारकरी महिलांनी सरकारचे आभार मानले आहे. बघा नेमकं काय म्हणाल्या वारकरी महिला….

Published on: Jul 03, 2024 05:58 PM