T20 World Cup 2024 : विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या 'चॅम्पियन्स'चं मराठमोळ्या पद्धतीनं दणक्यात स्वागत

T20 World Cup 2024 : विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या ‘चॅम्पियन्स’चं मराठमोळ्या पद्धतीनं दणक्यात स्वागत

| Updated on: Jul 05, 2024 | 5:25 PM

वर्षा या शासकीय निवासस्थानी टीम इंडियाच्या विश्व विजेत्या खेळाडूंमधील 4 मुंबईकर खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या चौघांना बाप्पाची मूर्ती आणि शाल देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं

मुंबईतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी टीम इंडियाच्या विश्व विजेत्या खेळाडूंमधील 4 मुंबईकर खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या चौघांना बाप्पाची मूर्ती आणि शाल देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. यानंतर विधानभवनात या चारही खेळाडूंचं मराठमोळ्या पद्धतीनं दणक्यात स्वागत करण्यात आलं. खेळाडू पोहचताच तुतारी वाजवून त्यांना पुष्पगुच्छ देण्यात आलं. त्यानंतर या खेळाडूंचं औक्षण देखील करण्यात आलं. सेंट्रल हॉलमध्ये आता या खेळाडूंचा खास सन्मान करण्यात येणार आहे. खेळाडू सेंट्रल हॉलमध्ये पोहचताच महाराष्ट्र गीत लावण्यात आलं. दरम्यान विधानभवनात या मुंबईकर खेळाडूंसह त्यांचे कोच पारस महाम्ब्रे आणि स्पोर्ट्स मसाज थेरपिस्ट असलेले अरुण कानडे हे देखील उपस्थित आहेत.

Published on: Jul 05, 2024 05:25 PM