जैन धर्मियांमधील दोन पंथात तुफान राडा, श्वेतांबर आणि दिंगबर आमने-सामने; नेमकं काय घडलं?

जैन धर्मियांमधील दोन पंथात तुफान राडा, श्वेतांबर आणि दिंगबर आमने-सामने; नेमकं काय घडलं?

| Updated on: Mar 20, 2023 | 12:03 AM

VIDEO | दिगंबर आणि श्वेतांबर दोन पंथीय एकमेकांना भिडले. श्वेतांबर पंथीयांची रॅली सुरू असताना दिगंबर पंथीयांनी घोषणा दिल्या आणि वादाची ठिणगी पडली

मुंबई : मंदिर परवानगी आणि रॅलीवरून जैन धर्मियांमधील दोन पंथात तुफान राडा झाला. श्वेतांबर आणि दिंगबर पंथीय एकमेकांना भिडले. वाशिममधील शिरपूरमध्ये हा सारा प्रकार घडल्याचे समोर आले. जगाला शांती आणि अंहिसेचा संदेश देणे हे जैन धर्माचं मूळ आहे. मात्र तेच मूळ विसरून जैन धर्मातील दोन पंथ एकनेकांवर तुटून पडले. वाशिम जिल्ह्यातील शिरपूर येथे ही घटना घडली. यावेळी दिगंबर आणि श्वेतांबर पंथीय एकमेकांना भिडले. श्वेतांबर पंथीयांची रॅली सुरू असताना दिगंबर पंथीयांनी घोषणा दिल्या आणि वादाची ठिणगी पडली. यानंतर घोषणाबाजी, हाणामारी आणि एकमेकांवर चपलफेकही पाहायला मिळाली. जैनांची काशी म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील शिरपूरची ओळख. इथं जैन धर्मियांचे 24 वे तिर्थनकार भगवान पार्श्वनाथ यांचे मंदिर आहे. या मंदिराचा वाद या दोन पंथामध्ये आहे. या वादावर न्यायालयात 42 वर्षांपासून प्रलंबित होता. गेल्या 10 तारखेला सर्वोच्च न्यायालयाने सदर मंदिर उघडण्याचा अधिकार श्वेतांबर पंथीयांना दिला. मात्र काल यावरून मंदिरात दोन पंथीयांमध्ये वाद झाले. त्यामुळे शिरपूर जैन येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. बघा याप्रकरणावरील टीव्ही 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Mar 19, 2023 11:54 PM