जैन धर्मातील श्वेतांबर आणि दिगंबर पंथीयांमधला वाद अखेर मिटला, पण कसा?
VIDEO | असा कोणता निर्णय झाला ज्यामुळे आमने-सामने आलेले जैन धर्मियांमधील दोन पंथ शांततेनेच दोन पाऊलं मागे आले आणि श्वेतांबर आणि दिंगबर पंथात झालेला वाद शमला
मुंबई : मंदिर परवानगी आणि रॅलीवरून जैन धर्मियांमधील दोन पंथात तुफान राडा झाला होता. श्वेतांबर आणि दिंगबर पंथीय एकमेकांना भिडले होते. वाशिममधील शिरपूरमध्ये हा सारा प्रकार घडल्याचे समोर आले. जगाला शांती आणि अंहिसेचा संदेश देणे हे जैन धर्माचं मूळ आहे. मात्र तेच मूळ विसरून जैन धर्मातील दोन पंथ एकनेकांवर तुटून पडल्याचे पाहायला मिळाले होते. श्वेतांबर पंथीयांची रॅली सुरू असताना दिगंबर पंथीयांनी घोषणा दिल्या आणि वादाची ठिणगी पडली होती. दरम्यान, त्याच वाशिम इथल्या शिरपूरमध्ये श्वेतांबर आणि दिगंबर पंथीयांमधला वाद आता मिटल्याचे समोर आले आहे. अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवान मंदिरावरून सुरू झालेला हा वाद आता मिटला असून 23 मार्चपासून कॅमेरासमोर मूर्तीला लेपन होणार आहे. या निर्णयानंतर जैन धर्मातील श्वेतांबर आणि दिगंबर या दोन्ही पंथातील लोकांकडून पेढे वाटत आनंद साजरा करण्यात आला आहे

पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड

गुंडाची दहशत, केकवर चक्क गुन्ह्यांची कलमं, बर्थ डे सेलिब्रेशनला...

'कचरा समजतो, नंतर येऊन हा काड्या...', दानवेंवर खैरे भडकले, आता थेट...

हलगर्जीपणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
