Video : निराशेला गोठवणारा हर्षद गोठणकर! निराशेच्या गुहेतून बाहेर काढणाऱ्या हर्षदची तेजोमय कहाणी

Video : निराशेला गोठवणारा हर्षद गोठणकर! निराशेच्या गुहेतून बाहेर काढणाऱ्या हर्षदची तेजोमय कहाणी

| Updated on: May 18, 2022 | 10:46 AM

पायानं कॅरम खेळणारा हर्षद एक आदर्श उदाहरण आहे. खिलाडू वृत्तीचं उत्तम उहारण असलेल्या हर्षद अनेकांना प्रेरणा देतोय.

मुंबई : आयुष्यातल्या अडचणींनी पिचून गेला असाल, तर संकाटांना सामोरं जाण्याची ताकद दिव्यांग हर्षद गोठणकरुन तुम्हाला मिळेल. लोकल, जिल्हा, आणि स्टेट लेव्हलच्या मॅच खेळणाऱ्या हर्षदला हात नाही. पायानं कॅरम खेळणारा हर्षद एक आदर्श उदाहरण आहे. खिलाडू वृत्तीचं उत्तम उहारण असलेल्या हर्षद अनेकांना प्रेरणा देतोय. हर्षदचा कॅरम चॅम्पियन होण्याच प्रवास सोपा नव्हता. खूप संघर्ष केलाय. तो नेमका कुठचा आहे? त्यानं फुटबॉलसोडून कॅरम खेळायचं का ठरवलं? पायानं कॅरम खेळायला तो शिकला कसा? हे जाणून घेण्यासारखंय.  आत्महत्यांचं वाढलेलं प्रमाण प्रचंड असताना टीव्ही 9 डिजीटलच्या प्रतिनिधी आरती औटी यांचा हा सक्सेस रिपोर्ट तुम्हाला बळ देऊन जाईल.. एकदा बघाच…