Special Report: अजान विरुद्ध हनुमान चालीसा! महाराष्ट्रात तणावाचा भोंगा
शनिवारी हनुमान जयंती आहे आणि त्याआधी भोंगे तसंच हनुमान चालिसावरुन महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय.
शनिवारी हनुमान जयंती आहे आणि त्याआधी भोंगे तसंच हनुमान चालिसावरुन महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय. मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसाचं पठण करावं. अन्यथा मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणू, असा इशारा खासदार नवनीत राणा आणि रवी राणांनी दिलाय. तर पुण्यात मनसेपाठोपाठ राष्ट्रवादीनंही हनुमान चालीसा आणि आरतीचं आयोजन करण्यात आलंय. विशेष म्हणजे हनुमान जयंतीच्या कार्यक्रमासह इफ्तारपार्टीचंही आयोजन करण्यात आलंय. हनुमान मंदिरातल्या या आरतीला राष्ट्रवादीचे मुस्लीम कार्यकर्तेही हजर राहणार असून आरतीनंतर मंदिरातला प्रसाद खाऊन मुस्लिम बांधव रोजा सोडणार आहेत. दरवर्षीच हनुमान जयंती महाराष्ट्रात साजरी होते. मात्र यावेळी राज ठाकरेंच्या हनुमान चालिसाच्या घोषणेनंतर, राजकीय वातावरणही बदललंय.पाहुयात tv9चा स्पेशल रिपोर्ट
Latest Videos