Special Report : महाराष्ट्राच्या राजकारणावर हसवणाऱ्या या 60 दिवसातील ऑडिओ-व्हीडिओ क्लिप
शहाजी बापू पाटील यांच्यासोबतच मागच्या दोन महिन्यांच्या काळात शिंदे गटातील मंत्री, आमदारांच्या वेगवेगळ्या व्हिडीओ क्लिप, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. लोकांनी, कार्यकर्त्यांनी नेत्यांना फोन करुन त्यांचे फोन रेकॉर्डिग व्हायरल केले.
मुंबई : काय झाडी, काय डोंगार, समदं ओक्के मदी… असं म्हणत रातोरात शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) सोशल मीडियात ट्रेन्ड झाले होते. सत्तांतर होण्याआधी गुवाहाटीमधील हॉटेलात असताना फक्त शहाजी बापू पाटील यांचीच एक ऑडिओ क्लिप (Viral Audio Clip) व्हायरल झाली होती. पण ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर काही दिवसांतच सत्तांतर झालं. त्यानंतर शहाजी बापू पाटील यांच्यासोबतच मागच्या दोन महिन्यांच्या काळात शिंदे (Eknath Shinde Group) गटातील मंत्री, आमदारांच्या वेगवेगळ्या व्हिडीओ क्लिप, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. लोकांनी, कार्यकर्त्यांनी नेत्यांना फोन करुन त्यांचे फोन रेकॉर्डिग व्हायरल केले. गेल्या 60 दिवसांतील या फोन रेकॉर्डिंगने महाराष्ट्राला हसायला भाग पाडलं. या ऑडिओ व्हिडीओ क्लिपबाबत टीव्ही 9 मराठीने केलेला हा स्पेशल रिपोर्ट…! पाहा व्हिडीओ…

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?

नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'

औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?

नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
