Anil Bonde | Congress कार्यकर्ते BJP कार्यालयावर आल्यास झोडून काढू, Bonde Audio Clip व्हायरल

| Updated on: Feb 09, 2022 | 9:38 AM

या वक्तव्यामुळे आता नवा वाद झेडला जाण्याची शक्यता आहे. काँग्रेस आज राज्यभर मोदींविरोधात निदर्शनं करणार आहेत.

काँग्रेसविरोधात तीव्र शब्दांत हल्लाबोल केल्यानंतर काँग्रेसचे नेते मोदींविरोधात आक्रमक झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minster Narendra Modi) यांचा निषेध करण्यासाठी आज राज्यभरात काँग्रेस निदर्शनं करणार आहे. दरम्यान, त्याआधी बुधवारी संध्याकाळी डॉ. अनिल बोंडे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात अनिल बोडें यांनी म्हटलंय की, ‘आज नाना पटोले (Congress Leader Nana Patole) यांनी म्हटलं की काँग्रेसचं काळं कुत्र जरी भाजप कार्यालयावर आलं, तर झोडून काढू! एका व्यक्तीसोबत फोनवर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. या वक्तव्यामुळे आता नवा वाद झेडला जाण्याची शक्यता आहे. काँग्रेस आज राज्यभर मोदींविरोधात निदर्शनं करणार आहेत. त्याआधी अनिल बोंडे (BJP Leader Anil Bonde) यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना थेट आव्हान दिलंय. याबाबतची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली आहे. एका व्यक्तीनं नाना पटोलेंच्या मोदींविरोधात नियोजित निषेध आंदोलनाबाबत बोलताना अनिल बोंडे यांनी हे वादग्रस्त विधान केल्यानं आता राजकारण तापण्याची शक्यता आहे.