Sambhajinagar : ‘लबाडांनो पाणी द्या’, संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक
Sambhajinagar Water Crisis Protest from Shivsena UBT :संभाजीनगर शहरात पाणी टंचाईची समस्या गंभीर झालेली असल्याने नागरिकांत संतापाची लाट पसरली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज उबथ गटकडून या ठिकाणी 'लबाडांनो पाणी द्या' हे आंदोलन करण्यात आलं
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने ‘लबाडांनो पाणी द्या’ या घोषणेसह आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी संभाजीनगरच्या मुकुंदवाडी, बाबा पेट्रोल पंप, क्रांती चौक, हर्सल टी पॉईंट या प्रमुख ठिकाणी रिकाम्या हंड्यांचे तोरण बांधून आणि घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विरोधी पक्ष नेते आमदार अंबादास दानवे हे देखील उपस्थित होते.
संभाजीनगर महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात असलेल्या असमतोलामुळे शहराला दररोज किंवा दोन दिवसाआड पाणी मिळायला हवे, मात्र प्रत्यक्षात 11 ते 12 दिवसांनी पाणी मिळत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे उबाठा गटाकडून हे आंदोलन आज करण्यात आले. या आंदोलनात रिकाम्या हंड्यांचे तोरण, नागरिक बैठका, सह्यांची मोहीम, ढोल बजाव आंदोलन, सायकल रॅली, महाविद्यालयीन युवकांशी संवाद, दवंडी, छायाचित्र प्रदर्शन, वार्ड पदयात्रा, कट्टा मीटिंग आणि जॅकवेल पाहणी यांचा समावेश असून, शहरातील विविध भागांमध्ये दररोज नव्या पद्धतीने आंदोलन करण्यात येणार आहे.

भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न

भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं

पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला

MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य
