मुंबईकरांनो....पाणी जपून वापरा, 'या' भागात उद्या पाणी बंद; तर उर्वरित भागात १० टक्के कपात

मुंबईकरांनो….पाणी जपून वापरा, ‘या’ भागात उद्या पाणी बंद; तर उर्वरित भागात १० टक्के कपात

| Updated on: Jan 03, 2024 | 6:40 PM

गुरुवारी २४ तास कुर्ला व भांडुपमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार असून शहर भागात १० टक्के पाणी कपात असणार आहे. गळती दुरुस्तीसाठी मुख्य वैतरणा जलवाहिनी भांडूप संकुल ते मरोशी बोगदापर्यंत रिक्त करावी लागणार आहे. दुरूस्त करण्याचे काम २४ तासांकरीता हाती घेण्यात येणार आहे.

मुंबई, ३ जानेवारी २०२४ : मुंबई महानगरपालिकेच्या पवई वेन्चुरी येथील अप्पर वैतरणा आणि वैतरणा यामधील ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनी जोडणीमध्ये गळती आढळून आली आहे. ही गळती रोखण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी २४ तास कुर्ला व भांडुपमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार असून शहर भागात १० टक्के पाणी कपात असणार आहे. गळती दुरुस्तीसाठी मुख्य वैतरणा जलवाहिनी भांडूप संकुल ते मरोशी बोगदापर्यंत रिक्त करावी लागणार आहे. जलवाहिनी रिक्त करून दुरूस्त करण्याचे काम गुरूवार ४ जानेवारी रोजी सकाळी १० ते शुक्रवार ५ जानेवारी रोजी सकाळी १० पर्यंत (२४ तासांकरीता) हाती घेण्यात येणार आहे. यामुळे मुंबईतील शहर भागातील आणि पूर्व उपनगरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. तसेच काही ठिकाणी पाण्याचा दाब कमी राहणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

Published on: Jan 03, 2024 06:40 PM