पंढरपुरात पुन्हा पूरस्थिती, चंद्रभागा नदीवरील पूल अन् मंदिरं पाण्याखाली
महिन्याच्या सुरूवातीला देखील पंढरपुरात तुफान पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले होत. त्यावेळी पंढरपुरातील जुना ऐतिहासिक दगडी पूल तसेच इस्कॉन घाट पाण्याखाली गेला होता. भीमा नदी पात्रात असणारे सर्व बंधारे देखील पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळाले. तसा पाऊस पुन्हा पंढरपुरात होतोय.
गेल्या काही तासांपासून उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे. पडत असलेल्या दमदार पावसामुळे उजनी आणि वीर धरणातून मिळून एक लाख तीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे चंद्रभागा नदीपात्रातील पाण्याची पातळी अचानक वाढली आहे. तर धरणातून सोडलेला विसर्ग पंढरपुरात पोहोचला असून सध्या चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहतांना दिसतोय. चंद्रभागेच्या वाळवंटात असलेले पुंडलिक मंदिरासह इतर छोटे मोठे मंदिर देखील पाण्याखाली गेली आहेत. चंद्रभागेच्या पात्रात असलेल्या जुना दगडी फुल देखील पाण्याखाली गेला आहे .त्यामुळे पंढरपुरात पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Published on: Aug 26, 2024 04:03 PM
Latest Videos