Ambernath Rain | अंबरनाथच्या मोरीवली भागात कमरेइतकं पाणी, रस्त्यांना नदीचं स्वरूप
पाण्याचा निचरा व्हायला जागाच नसल्यामुळे दर पावसाळ्यात या भागात जवळपास गुडघाभर पाणी साचत असतं. या सगळ्याबद्दल अनेकदा तक्रारी करून देखील नगरपालिका प्रशासन लक्ष देत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करतात.
अंबरनाथ : शहरातील मोरीवली पाडा परिसरात मागील काही वर्षात नव्याने मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आली आहे. मात्र या भागात मूलभूत सुविधांचा अजूनही अभावच असून त्यामुळे गेल्या काही तासात आलेल्या मुसळधार पावसानंतर या भागातल्या रस्त्यांचे अक्षरश: तलाव झाले आहेत. पाण्याचा निचरा व्हायला जागाच नसल्यामुळे दर पावसाळ्यात या भागात जवळपास गुडघाभर पाणी साचत असतं. या सगळ्याबद्दल अनेकदा तक्रारी करून देखील नगरपालिका प्रशासन लक्ष देत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करतात.
Latest Videos