भर पावसाळ्यात गावकऱ्यांची पाण्यासाठी पायपीट; हंडा-कळशी घेऊन चिमुकले, वृद्धही पाण्याच्या शोधात
मुसळधार पावसामुळे काही धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. मात्र छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातल्या एका गावातील भीषण वास्तव भर पावसाळ्याच्या दिवसांत समोर आले आहे. नागरिकांना दोन किलोमीटर लांब जाऊन डोंगर उताराहून एका झऱ्यातून पाणी भरावे लागत आहे.
एकीकडे महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. अनेक नद्यांना पूर आला आहे तर अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे गावच्या गावं पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळत आहे. तर मुसळधार पावसामुळे काही धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. मात्र छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातल्या एका गावातील भीषण वास्तव भर पावसाळ्याच्या दिवसांत समोर आले आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यातील सावखेड या गावांमध्ये मात्र पाण्यासाठी नागरिकांची अजूनही पायपीट सुरू आहे. या गावाला शासकीय योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्याची कुठलीच योजना राबवली गेली नाही. त्यामुळे गावातल्या नागरिकांना दोन किलोमीटर लांब जाऊन डोंगर उताराहून एका झऱ्यातून पाणी भरावे लागत आहे. भर पावसाळ्यातही नागरिकांची पाण्यासाठी पायपीट होत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.