Special Report | पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याच जिल्ह्यात पाणीटंचाई, गावकऱ्यांचानी काय केला आरोप?
VIDEO | पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याच जिल्ह्यात पाणीटंचाई, काय आहे कारण? बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे जळगावचे आहेत मात्र त्यांच्याच जिल्ह्यातील काही गावं भीषण पाणीटंचाईला तोंड देताय. या गावातील काही गावकऱ्यांनी आमची गावं हेतूपूर्वक पाणी योजनेतून वगळल्याचा आरोप केला. स्वतःला पाणीवाला बाबा म्हणणारे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात मतदारसंघात भीषण पाणीटंचाई जाणवते. हर घर जल या केंद्राच्या योजनेत जलजीवन मिशनची कामं महाराष्ट्रात सुरूये. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत गावातून मतदान पडलं नाही म्हणून आमच्या गावातील पाणी योजनेवर लाल शेरा मारल्याचा आरोप लोनवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. जळगावातील ५५ गावात भीषण पाणी टंचाई सध्या जाणवतेय. २३ गावांना पाणी पुरवठा होतोय. पाणी पुरवठा मंत्री जळगावचे असून त्यांच्या गावात मनारखेडा मध्ये मनसेने टँकरने पाणी पुरवठा केलाय. नशेराबाद गावात गावकऱ्यांनी आपल्या घागरी फोडून राग व्यक्त केला. तर ज्यागावातून पाण्याची मागणी केली जात आहे. त्यांना टँकरने पाणी पुरवण्याचे काम सुरू आहे, असा दावा निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी केलाय.