Mumbai water : मुंबईतल्या कुर्ला, घाटकोपर, लालबागमध्ये 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

Mumbai water : मुंबईतल्या कुर्ला, घाटकोपर, लालबागमध्ये 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

| Updated on: May 13, 2022 | 11:47 AM

मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येतंय.

मुंबई : मुंबईतील (Mumbai Water issue) महत्त्वाच्या भागात दोन दिवस पाणीबाणी जाणवण्याची शक्यता आहे. कुर्ला, घाटकोपरसह लालबागमध्ये दोन दिवस पाणीपुरवठ्यावर परिणाम जाणवणार आहे. महापालिकेकडून (BMC) केल्या जाणाऱ्या कामाच्या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठा प्रभावित होण्याची चिन्ह आहेत. त्या पार्श्वभूमीवर 18 मे पासून 19 मे पर्यंत पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. विद्याविहार इथं सूक्ष्मबोगदा पद्धतीनं जलवाहिन्या वळवण्याचं पहिल्या टप्प्याचं काम सुरु होणार आहे. हे काम 18 आणि 19 मे रोजी हाती घेतलं जाईल. त्यामुळे मुंबईतल्या बहुतांश भागातील पाणी पुरवठ्यावर (Mumbai Water supply News) परिणाम जाणवले. यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येतंय. काही ठिकाणी 18 मे रोजी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद असेल तर काही भागात कमी दाबानं पाणीपुरवठा होईल, असं पालिका प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

Published on: May 13, 2022 11:45 AM