मराठवाड्याचा पाणीप्रश्न सुटला? सुप्रीम कोर्टाकडून मराठवाड्याला नेमका दिलासा काय?
सर्वोच्च न्यायालयाने मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर मराठवाड्याला दिलासा दिला आहे. जायकवाडीला नाशिकच्या धरणातून पाणी सोडण्याचा जो निर्णय झाला होता त्याला स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला होता. मात्र यावरून मराठवाडा आणि नाशिकचे मंत्री आमने-सामने आले होते.
मुंबई, २२ नोव्हेंबर २०२३ : सर्वोच्च न्यायालयाने मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर मराठवाड्याला दिलासा दिला आहे. जायकवाडीला नाशिकच्या धरणातून पाणी सोडण्याचा जो निर्णय झाला होता त्याला स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला होता. मात्र यावरून मराठवाडा आणि नाशिकचे मंत्री आमने-सामने आले होते. सुप्रीम कोर्टातून मराठवाड्याला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून मराठवाड्याच्या धरणाला पाणी सोडलं जाणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील धरणांमधून जायकवाडी धरणात 8.5 टीएमसी पाणी सोडलं जाणार आहे. अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडलं जाणार आहे. तर मुळा (मांडओहोळ मुळा) प्रकल्पातून 2.19 टीएमसी पाणी सोडलं जाईल आणि प्रवरा (भंडारदरा, निळवंडे, आढळा, जापूर) प्रकल्पातून 3.36 टीएमसी पाणी सोडलं जाणार आहे, गंगापूर धरणातून (गोदावरी, काश्यपी, गौतमी गोदावरी) येथून 0.5 टीएमसी तर गोदावरी दारणा (आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी) येथून पाणी सोडलं जाणार आहे.