मराठवाड्यातील पाणी प्रश्न मिटला, कुठल्या धरणातून किती पाणी सोडणार?

मराठवाड्यातील पाणी प्रश्न मिटला, कुठल्या धरणातून किती पाणी सोडणार?

| Updated on: Nov 21, 2023 | 3:32 PM

गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील पाणी प्रश्नांवर राज्यात चर्चा सुरू होती. दरम्यान, मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर मोठी बातमी समोर आली आहे. त्यामुळे मराठवाड्याचा पाणी प्रश्न आता मिटणार असल्याचे सांगितले जात आहे. उत्तर महाराष्ट्राच्या धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडलं जाणार

मुंबई, २१ नोव्हेंबर २०२३ : गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील पाणी प्रश्नांवर राज्यात चर्चा सुरू होती. दरम्यान, मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर मोठी बातमी समोर आली आहे. त्यामुळे मराठवाड्याचा पाणी प्रश्न आता मिटणार असल्याचे सांगितले जात आहे. उत्तर महाराष्ट्राच्या धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडलं जाणार आहे. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यानुसार उत्तर महाराष्ट्रातील धरणांमधून जायकवाडी धरणात 8.5 टीएमसी पाणी सोडलं जाणार आहे. अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडलं जाणार आहे. तर मुळा (मांडओहोळ मुळा) प्रकल्पातून 2.19 टीएमसी पाणी सोडलं जाईल आणि प्रवरा (भंडारदरा, निळवंडे, आढळा, जापूर) प्रकल्पातून 3.36 टीएमसी पाणी सोडलं जाणार आहे, गंगापूर धरणातून (गोदावरी, काश्यपी, गौतमी गोदावरी) येथून 0.5 टीएमसी तर गोदावरी दारणा (आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी) येथून पाणी सोडलं जाणार आहे.

Published on: Nov 21, 2023 03:32 PM