विरोधात बसायला आम्हाला काही अडचण नाही- नाना पटोले

विरोधात बसायला आम्हाला काही अडचण नाही- नाना पटोले

| Updated on: Jun 29, 2022 | 12:51 PM

"सत्तेपेक्षा राज्यात स्थिरता असणं महत्त्वाचं आहे. हाच आमचा प्रयत्न आहे. विरोधात बसायला आम्हाला काही अडचण नाही", असंही त्यांनी स्पष्ट केलं.

“जनता संभ्रमात आली आहे. एकीकडे राज्यात पाऊस नाही, भाजपला सत्तेच्या लालसेपोटी जनतेच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काही घेणं देणं नाही. फक्त खुर्ची कशी मिळेल यासाठी सगळे प्रयत्न सुरू आहेत. 1 जुलैला शपथविधी होणार, अशा घोषणाही ते करू लागले आहेत. नेमकं काय चाललंय ते कळतच नाही,” असं नाना पटोले म्हणाले. “काँग्रेसचं स्पष्ट आहे, दु:खात असो किंवा सुखात, आपण सोबत राहायचं. ज्याच्याशी मैत्री करायची, ती प्रामाणिक करायची. ज्याच्या भरोशावर मोठं व्हायचं आणि त्याचंच घर पोखरून टाकायचं ही काँग्रेसची भूमिका नाही. ही भाजपची भूमिका आहे. सत्तेपेक्षा राज्यात स्थिरता असणं महत्त्वाचं आहे. हाच आमचा प्रयत्न आहे. विरोधात बसायला आम्हाला काही अडचण नाही”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Published on: Jun 29, 2022 12:51 PM