“संजय राऊतांना गुवाहाटीला कोण बोलवतय? आम्हाला त्यांना पहायचं पण नाही” VIDEO
"आमदार त्यांच्यावर प्रचंड संतप्त आहेत. त्यांनी इथे येवूच नये. रागाच्या भरात कोणाच्या तोंडातून कुठले अपशब्द निघू नयेत, एवढीच मी प्रार्थना करतो"
मुंबई: शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर गुन्हे दाखल झाले असतील, तर मला माहित नाही, असं शिवसेना आमदार आणि बंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak kesarkar) म्हणाले. माझी मान कापली, तरी मी गुवाहाटीमध्ये जाणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. त्या संबंधी केसरकरांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, “संजय राऊतांना गुवाहाटीला कोणी बोलावलाय? आम्ही त्यांना बोलावलं नाही. आम्हाला त्यांना बघायच पण नाही” “आमदार त्यांच्यावर प्रचंड संतप्त आहेत. त्यांनी इथे येवूच नये. रागाच्या भरात कोणाच्या तोंडातून कुठले अपशब्द निघू नयेत, एवढीच मी प्रार्थना करतो. असा प्रवक्ता दुसऱ्या कुठल्या पक्षाला मिळू नये. ते लोकांना दुखावतात. ज्या लोकांनी आपलं आयुष्य वेचलं शिवसेनेसाठी (Shivsena) त्यांच्याबद्दल असभ्य शब्दामध्ये बोलले आहेत. मी त्यांना हातजोडून विनंती करीन की, तुम्ही येऊच नये” असे दीपक केसरकर म्हणाले.