VIDEO : Bacchu Kadu | शाळा सुरु करण्याचे धाडस करताना विचार करावा लागेल : बच्चू कडू
शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाराष्ट्रातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरु करण्याबाबत मोठं विधान केलं आहे. कोरोनामुक्त गावांमध्ये 10 आणि 12 वीचे वर्ग सुरु करण्याबाबत शक्यता तपासण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या.
शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाराष्ट्रातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरु करण्याबाबत मोठं विधान केलं आहे. कोरोनामुक्त गावांमध्ये 10 आणि 12 वीचे वर्ग सुरु करण्याबाबत शक्यता तपासण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या. मात्र, कोरोनामुक्त गावं कोरोनाग्रस्त होऊ शकतात त्यामुळे शाळा सुरु करण्याचं धाडस करताना विचार करावा लागेल, असं बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडू यांनी कोरोना संकटाच्या काळात माणूस महत्वाचा आहे,आरोग्य महत्त्वाचे आहे. शिक्षण कशा पद्धतीने सुरू करता येईल हा सर्वांसमोर प्रश्न आहे. मात्र, शाळा सुरू करताना मोठं धाडस करावं लागेल, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिलीय.
Latest Videos