MNS| आम्ही कुठलीही गोष्ट निवडणुकीसाठी करत नाही – अविनाश जाधव
"कल्याण-डोंबिवली, बदलापूर येथे आमची कार्यालय आहेत. भिवंडीत कार्यालय नव्हतं. ते आता सुरु झालं आहे. या माध्यमातून आम्हाला जनसेवा करता येईल. लोकांना न्याय देण्याचं काम करु"
भिवंडीत मनसेने (MNS) नवीन कार्यालय सुरु केलं आहे. आज राज ठाकरेंच्या (Raj thackeray) हस्ते या कार्यालयाच उद्घाटन झालं. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash jadhav) यांना या बद्दल विचारले असता ते म्हणाले की, “आम्ही कुठलीही गोष्ट निवडणुकीसाठी करत नाही. अनेक लोक भिवंडीवरुन आपली कामं घेऊन ठाण्यात येत होती. त्यांना ते लांब पडत होतं. कल्याण-डोंबिवली, बदलापूर येथे आमची कार्यालय आहेत. भिवंडीत कार्यालय नव्हतं. ते आता सुरु झालं आहे. या माध्यमातून आम्हाला जनसेवा करता येईल. लोकांना न्याय देण्याचं काम करु” असं अविनाश जाधव यांनी सांगितलं.
Latest Videos