नुकसानग्रस्तांसाठी गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये करणार 'ही' मागणी

नुकसानग्रस्तांसाठी गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये करणार ‘ही’ मागणी

| Updated on: May 02, 2023 | 11:25 AM

VIDEO | जळगाव जिल्ह्यात अवकाळीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना गुलाबराव पाटील यांचा शब्द, काय करणार मागणी?

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटने चांगलाच हैदोस घातला आहे. या अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना त्याचा मोठा आर्थिक फटका देखील बसला आहे. यामुळे बळीराजा चिंतेत आहे. तर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी म्हणून कॅबिनेटमध्ये मागणी करणार, असल्याचा शब्द शिवसेनेते नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. जळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य ठिकाणी अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतीचे तसेच घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी म्हणून आपण कॅबिनेटमध्ये मागणी करणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार शासनाकडून दुप्पट मदत मिळवून देऊ असंही गुलाबराव पाटील म्हणाले.

 

 

Published on: May 02, 2023 11:25 AM