लोकतंत्रसाठी आम्ही लढणार आहोत – : K. Chandrashekar Rao

| Updated on: Feb 20, 2022 | 8:13 PM

देशाच्या विकासावर आणि येणाऱ्या काळातील दिशेबाबत चर्चा झाली. सर्व विषयांवर बातचीत झाल्याचे आणि एकमत झाल्याचे राव यांनी सांगितले. देशात पुढे एकत्र काम करणार असल्याचेही राव यांनी सांगितले. तसेच यानंतरही या नेत्यांच्या भेटीगाठी होणार आहेत.

मुंबई : आज तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांची भेट झाली. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी आणि राव यांनी संयुक्त पत्रकार परिषदत घेत देशातल्या परिवर्तनाची सुरूवात महाराष्ट्रतून झाली आहे. अशी हाक दिली. या भेटीने राजाकारणातला सस्पेन्स सकाळपासूनच वाढवला होता. त्यानंतर या पत्रकार परिषदेची सुरूवात संजय राऊतानी (Sanjay Raut) केली. देशाच्या राजकारणाबाबत आणि परिस्थितीबाबत मी चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे राव यांनी सांगितलं. देशाच्या विकासावर आणि येणाऱ्या काळातील दिशेबाबत चर्चा झाली. सर्व विषयांवर बातचीत झाल्याचे आणि एकमत झाल्याचे राव यांनी सांगितले. देशात पुढे एकत्र काम करणार असल्याचेही राव यांनी सांगितले. तसेच यानंतरही या नेत्यांच्या भेटीगाठी होणार आहेत.