Kishori Pednekar | पावसात मुंबईतील रस्ते पाण्याखाली जाणार नाही याची आम्ही काळजी घेऊ : किशोरी पेडणेकर

Kishori Pednekar | पावसात मुंबईतील रस्ते पाण्याखाली जाणार नाही याची आम्ही काळजी घेऊ : किशोरी पेडणेकर

| Updated on: Jun 09, 2021 | 2:21 PM

मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपून काढलंय. मुंबईतील परिस्थितीचा महापौर किशोरी पेडणेकर यांनी आढावा घेतला. पाणी भरणार नाही असा दावा आम्ही कधीच केला नाही, चार तासात पाण्याचा निचरा होतो, असं पेडणेकर यांनी नमूद केलं.

मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपून काढलंय. मुंबईतील परिस्थितीचा महापौर किशोरी पेडणेकर यांनी आढावा घेतला. दहिसर मिलन सब वे, हिंदमाता कायम पाण्याखाली जातं, पण आता पाणी साचलेलं नाही. पाण्याचा निचरा झाला आहे. पाणी भरणार नाही असा दावा आम्ही कधीच केला नाही, चार तासात पाण्याचा निचरा होतो, असं पेडणेकर यांनी नमूद केलं.