Anil Parab | संप मिटत नाही तोपर्यंत प्रयत्न करणार : अनिल परब
परिवहन मंत्री अनिल परब आणि शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आणि आजच्या चर्चेबाबत महिती दिली. अनिल परब म्हणाले की, राज्य शासनाने सातव्या वेतन आयोगानुसार पगारवाढ द्यावी, या मागणीचा विचार एसटी सुरू झाल्यानंतर करण्यात येईल, याबाबत शासन सकारात्मक विचार करेल.
परिवहन मंत्री अनिल परब आणि शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आणि आजच्या चर्चेबाबत महिती दिली. अनिल परब म्हणाले की, राज्य शासनाने सातव्या वेतन आयोगानुसार पगारवाढ द्यावी, या मागणीचा विचार एसटी सुरू झाल्यानंतर करण्यात येईल, याबाबत शासन सकारात्मक विचार करेल. कारण जी पगारवाढ दिली आहे, ते दोन करार आणि फरक यांचा विचार करून शासन निर्णय घेईल यावर आज चर्चा झाली. तसेच जे कर्मचारी कामावर येतील त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. अशी माहिती अनिल परब यांनी दिली.
आतापर्यंत आम्ही कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी तीनवेळा आम्ही मुदत दिली होती, यावेळी हेही सांगितलं होतं की, कामावर आल्यावर कारवाई होणार नाही. ज्या एसटी कर्मचाऱ्यांवर आतापर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही, अशा कामगारांवर कोणतीही कारवाई होणार नाही, कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांबद्दलचा अंतिम निर्णय लवकरच घेऊ. जसे कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आमचे दायित्व आहे, तसेच जनतेच्या प्रतीही आमचे दायित्व आहे, त्यामुळे आम्हाला तोही विचार करावा लागेल. तशी चर्चा कृती समितीबरबोर झाली आहे. जनतेला वेठीस धरून कुणालाही फायदा होणार नाही, असेही परब म्हणाले.