महिला बचत गटांसाठी मोठी बातमी, राज्य सरकारनं घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
VIDEO | महिलांनो तुम्ही बचत गटात आहात का? तुमच्यासाठी राज्य सरकारकडून आनंदाची बातमी, महिला बचत गटांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार, उद्यापासून महिला बचत गटांसाठी आठवडी बाजारांची सुरूवात होणार
मुंबई, १८ ऑगस्ट २०२३ | महिला बचत गटांसाठी एक आनंदाची आणि मोठी बातमी आहे. महिला बचत गटांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार, उद्यापासून महिला बचत गटांसाठी आठवडी बाजारांची सुरूवात होणार आहे. तर मुंबईत महिला बचत गटांसाठी मोफत जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही घोषणा केली आहे. तर यंदाच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, महिला बचत गटांच्या सदस्यांची संख्या १० कोटी आहे. तुम्ही गावी गेल्यावर तुम्हाला बँक वाली दीदी, अंगणवाडी दीदी आणि औषधी दीदी दिसतील. गावागावात दोन कोटी लखपती दीदी बनवण्याचे माझे स्वप्न आहे. महिला बचत गटांना बळकट करण्याच्या उद्देशाने सरकार कृषी तंत्रज्ञान क्षेत्रासाठी नवीन धोरण आखत असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.