राज ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत, मात्र त्यांनी आता ठाम राहावे - दवे

राज ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत, मात्र त्यांनी आता ठाम राहावे – दवे

| Updated on: Apr 07, 2022 | 11:03 AM

राज ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत करतो, मात्र राज ठाकरे यांनी जी मशिदीवरील भोंग्याबाबत भूमिका घेतली ती आता मागे घेऊ नये असं हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत करतो, मात्र राज ठाकरे यांनी जी मशिदीवरील भोंग्याबाबत भूमिका घेतली ती आता मागे घेऊ नये अशी मागणी हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी अतिशय योग्य भूमिका घेतली आम्ही राज ठाकरेंच्या वक्तव्याचे समर्थन करतो. हींदू महासंघाने राज ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत केले, मात्र राज ठाकरे हे आपली भूमिका मागे घेतील, किंवा अप्रत्यक्षपणे या भूमिकेतून बाहेर पडतील अशी भीती आम्हाला आहे. मात्र राज ठाकरे यांनी आता आपल्या भूमिकेवर ठाम राहावे असे दवे यांनी म्हटले आहे.