New Year 2025 : भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डी अन् दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
नवीन वर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी विठुरायाची पंढरी नगरी आज पहाटेपासूनच गजबजून गेली आहे. आज सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी विविध मंदिर परिसरात गर्दी केली आहे.
नव वर्ष २०२५ चं स्वागत भाविकांनी देवदर्शनाने केल्याचे पाहायला मिळाले. पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. नवीन वर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी विठुरायाची पंढरी नगरी आज पहाटेपासूनच गजबजून गेली आहे. आज सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी विविध मंदिर परिसरात गर्दी केली आहे. नवीन वर्षाचं स्वागत आणि पंढरपूर, शिर्डी, शेगाव, अक्कलकोट, पुणे, कोल्हापूर, तुळजापूर येथे दर्शनासाठी दरवर्षी राज्यभरातून हजारो भाविक येत असतात. यंदाही नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यभरातील देवस्थान, मंदिर क्षेत्र भक्त-भाविकांनी आणि पर्यटकांनी फुलून गेली आहे. तर नव्या उमेदीसह सर्वत्र नव्या वर्षाचं जल्लोषात आणि आनंदात स्वागत होत आहे. २०२५ या नव्या वर्षाचा पहिला सूर्यादय झाला अन् तांबूस पिवळा रंगांनी आकाश सजल्याचेही पाहायला मिळाले. देवदर्शनासह नवीन वर्षाचा पहिला सूर्योदय पाहण्यासाठी महाराष्ट्रातील रत्नागिरी, आसाममधील गुवाहाटी अन् तमिळनाडू येथील मदुराईसह अनेक पर्यटनस्थळांवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.