Munde On OBC Verdict | ओबीसी आरक्षणाच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं स्वागत, महाविकास आघाडी सरकारच्या कार्याची ही पोचपावती, धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया
Munde on OBC Verdict | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी ओबीसी आरक्षणाबाबत (OBC Reservation) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
Munde On OBC Verdict News | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी ओबीसी आरक्षणाबाबत (OBC Reservation) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) काळातच या प्रश्नी काम झाल्याचे सांगायला ते विसरले नाहीत. बांठिया आयोगाची स्थापना महाविकास आघाडीच्या काळात करण्यात आली. या आयोगाने न्यायालयाने घालून दिलेल्या नियमानुसार ट्रिपल टेस्ट केली. डाटा गोळा केला. आज सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाचा (Banthiya Commission) अहवाल स्वीकारला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका या ओबीसी आरक्षणासह घेण्याचा आदेश दिला. तसेच या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. राष्ट्रवादी पक्षाने या निर्णयापूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीत ओबीसी आरक्षणाच्या 27 टक्के प्रमाणे उमेदवार देऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता, असे त्यांनी यावेळी सांगितले.