मराठा आरक्षण देण्यासाठी तारखेचा घोळ, नेमकी मुदत किती २४ डिसेंबर की २ जानेवारी?
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी दोन महिन्यांची मुदत दिली. मात्र या मुदतीवरून संभ्रम निर्माण झालाय. २४ डिसेंबर की २ जानेवारी अशा दोन तारखांवरून हा घोळ सध्या सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मराठा आरक्षणासाठी सरकारला किती मुदत?
मुंबई, ४ नोव्हेंबर २०२३ | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी दोन महिन्यांची मुदत दिली. मात्र या मुदतीवरून संभ्रम निर्माण झालाय. २४ डिसेंबर की २ जानेवारी अशा दोन तारखांवरून हा घोळ सध्या सुरू आहे. २४ डिसेंबर ही तारीख लक्षात घेऊनच सरकारने निर्णय घ्यावा नाहीतर, निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अडचणी वाढतील असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले. मनोज जरांगे पाटील २४ डिसेंबर म्हणताय तर सरकार २ जानेवारी म्हणतंय. याच तारखेच्या झालेल्या घोळ वरून संजय राऊत यांनी राज्य सरकारवर बोचरी टीका केली. सुप्रीम कोर्टाने शिंदेंसह १६ आमदार अपात्रतेच्या निकाल देण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत सरकार जाणार त्यामुळे हुशारीने मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. तर बच्चू कडू यांनी देखील २४ डिसेंबरच्या तारखेचा उल्लेख केला. बघा ते काय म्हणाले?