‘अजितदादा मुख्यमंत्री झाले तरी अधिक चांगलंय…’, भुजबळांचा CM म्हणून फडणवीसांना विरोध? नेमकं काय म्हणाले?
ओबीसींच्या हक्कावर गदा येऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काम केलं. १३२ आमदार निवडून आल्यानंतर भाजपाचा मुख्यमंत्री होणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काही नाही. जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा सगळ्यांना वाटत होतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री....
ओबीसी मुख्यमंत्री राज्याला मिळायला हवा का? असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांना केला असता या प्रश्नावर त्यांनी आपलं मतं मांडलं. ओबीसी मुख्यमंत्री व्हावा यापेक्षा ओबीसी, दलित, गरिबांचं संरक्षण करणारा मुख्यमंत्री व्हावा, असं छगन भुजबळांनी स्पष्टपणे म्हटलं तर पुढे भुजबळ असेही म्हणाले, ओबीसींच्या हक्कावर गदा येऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काम केलं. १३२ आमदार निवडून आल्यानंतर भाजपाचा मुख्यमंत्री होणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काही नाही. जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा सगळ्यांना वाटत होतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेबाहेर राहून काम करेन असं सांगितलं होतं. पण त्यांना दिल्लीतून आदेश आला की तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करायचं आहे. तेव्हा त्यांनी पक्षाचा आदेश मानला’ दरम्यान, संख्याबळाचा दाखला देत ते म्हणाले, यंदा भाजपचा मुख्यमंत्री होणार कारण १३२ आमदार ज्यांचे त्यांचा मुख्यमंत्री… फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आनंद असे ते म्हणाले. तसेच फडणवीस यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या. तर अजितदादा जरी मुख्यमंत्री झाले तरी अधिक चांगलं, असं जरी भुजबळ म्हणत असले तरी मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचा नैसर्गिक हक्क आहे, असे ते म्हणाले.