अपशब्द अन् आकस नको, विठुरायाच्या महापूजेनंतर देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन काय?

अपशब्द अन् आकस नको, विठुरायाच्या महापूजेनंतर देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन काय?

| Updated on: Nov 23, 2023 | 5:48 PM

समाजाचे प्रश्न मांडतांना आग्रही राहिले पाहिजे, पण समाजाचे ते प्रश्न मांडताना दुसऱ्या समाजाबद्दल अपशब्द किंवा आकस नको, कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे केलेल्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी हे आवाहन करत विठुरायाच्या चरणी प्रार्थना

पंढरपूर, २३ नोव्हेंबर २०२३ : समाजा-समाजातील असणारं तेढ दूर करायचे असतील तर वारकरी संप्रदायाचं व्हावं लागेल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. समाजाचे प्रश्न मांडतांना आग्रही राहिले पाहिजे, पण समाजाचे ते प्रश्न मांडताना दुसऱ्या समाजाबद्दल अपशब्द किंवा आकस नको, कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे केलेल्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी हे आवाहन करत विठुरायाच्या चरणी प्रार्थना केल्याचे आज पाहायला मिळाले. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी त्यांच्या माणसांना थांबवावं, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, हे आव्हान करत असताना छगन भुजबळ यांना वक्तव्य करण्यासाठी सरकारची फूस आहे का अशी शंका व्यक्त करत जरांगे पाटील यांनी सवाल उपस्थित केला आहे.

Published on: Nov 23, 2023 05:48 PM