Kishori Pednekar | मुंबईत अशुद्ध पाणी पुरवठ्यावर महापौर किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या ?
मुंबईतील दादर, धारावी, परळ, भायखळा, गोरेगाव आणि मुलुंड या भागात पुरवठा करण्यात येणारे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचं दिसून आलं आहे. या भागातील पाणी दूषित असल्याची धक्कादायक माहिती मुंबई महापालिकेच्याच जल विभागाच्या अहवालातून उघड झाली आहे.
मुंबईतील दादर, धारावी, परळ, भायखळा, गोरेगाव आणि मुलुंड या भागात पुरवठा करण्यात येणारे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचं दिसून आलं आहे. या भागातील पाणी दूषित असल्याची धक्कादायक माहिती मुंबई महापालिकेच्याच जल विभागाच्या अहवालातून उघड झाली आहे. तसेच हे पाणी प्यायल्याने अतिसारासारखे आजारही बळावण्याची शक्यता या अहवालात वर्तवण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या जल विभागाने हा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार दादर, धारावी, परळ, भायखळा, गोरेगाव, मुलुंडमधील पाणी दूषित असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. जुन्या आणि खराब पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनमुळे पाण्याच्या दूषितेत वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. दूषित पाण्यामुळे अतिसार सारखे आजार बळावू शकतात, असंही नमूद करण्यात आलं आहे.
Latest Videos