भाजप अन् एकनाथ शिंदे यांच्याबद्दल उद्धव ठाकरे काय बोलले? बघा बैठकीतली INSIDE STORY
VIDEO | उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना डांबून ठेवणार होते? भाजप अन् एकनाथ शिंदे यांच्याबद्दल उद्धव ठाकरे बैठकीत नेमकं काय बोलले? उद्धव ठाकरे यांच्या बैठकीतली INSIDE STORY
मुंबई, २४ ऑगस्ट २०२३ | आपण भाजप सोबत पॅचअप केलं असतं पण नितीमत्तेत बसत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे सर्व ४८ जागांचा आढावा घेतायत. त्याच बैठकीतील INSIDE STORY टिव्ही ९ मराठीच्या हाती लागली आहे. मी मुख्यमंत्री होतो माझ्या आमदारांना डांबून ठेवू शकलो असतो. पण ते मनानेच फुटले होते अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे त्यांच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांसमोर म्हणाले, ‘२०१४ पासून ज्यांनी फसवलं, त्यांच्यासोबत कसं जाणार? माझ्या आमदारांना डांबून ठेवू शकलो असतो. पण ते मनानेच फुटले होते त्यांना डांबून काय करणार होतो, त्यांना काय कमी केले. जुने निष्ठावंत पक्ष सोडून जातात त्याचे वाईट वाटते, कोणाला जायचं असेल तर खुशाल जा…संकट येतात आणि जातात मी खंबीर आहे. आपण पुन्हा सत्तेत येणार…माझा काही स्वार्थ नाही, मला निवडणूक लढवायची नाही’, असेही उद्धव ठाकरे म्हणालेत.