Sharad Pawar | ममतादीदी-पवारांच्या बैठकीत नेमकं काय घडलं? कॉंग्रेसची चिंता वाढणार?

Sharad Pawar | ममतादीदी-पवारांच्या बैठकीत नेमकं काय घडलं? कॉंग्रेसची चिंता वाढणार?

| Updated on: Dec 01, 2021 | 4:49 PM

देशाच्या राजकारणाला मोठे वळण देण्याची ताकद असलेली महत्त्वाची बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात ही बैठक झाली.

देशाच्या राजकारणाला मोठे वळण देण्याची ताकद असलेली महत्त्वाची बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात ही बैठक झाली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी झालेल्या चर्चेत शरद पवार यांनी देशाचे भावी नेतृत्व कोण करेल, कोण-कोणत्या पक्षांची एकी होईल, याविषयी काही संकेत दिले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची ठरतील.

शरद पवार म्हणाले, ” सध्याच्या काळात एकत्रित नेतृत्व करण्याची गरज आहे. मजबूत 2024 च्या निवडणुकीकरता सत्ताधारी पक्षाविरोधात एक मजबूत नेतृत्व उभारण्याची गरज आहे. याच हेतूस्तव ममता बॅनर्जी यांनी हा दौरा केला. या बैठकीत त्यांनी अत्यंत सकारात्मक चर्चा केली.