आमदारांना न भेटण्याचं कारण नेमकं काय? उद्धव ठाकरे म्हणाले...

आमदारांना न भेटण्याचं कारण नेमकं काय? उद्धव ठाकरे म्हणाले…

| Updated on: Jun 22, 2022 | 6:17 PM

एकनाथ शिंदे आणि इतर शिवसेना बंडखोर नेत्यांसाठीच साधण्यात येत असल्याचं दिसून येत होतं. मुख्यमंत्री आम्हाला भेटत नाहीत

मुंबई: बऱ्याच वेळच्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री (Chief Minister) फेसबुकवर लाईव्ह (Facebook Live) आले आणि त्यांनी जनतेशी संवाद साधला. खरंतर हा संवाद एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि इतर शिवसेना बंडखोर नेत्यांसाठीच साधण्यात येत असल्याचं दिसून येत होतं. मुख्यमंत्री आम्हाला भेटत नाहीत, वेळ देत नाहीत या आमदारांच्या तक्रारीचं स्पष्टीकरण, त्यावर उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आहे. तब्येत बरी नसायची आणि शस्त्रक्रिया झाली होती त्यामुळे भेटणं शक्य नव्हतं असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरे यांनी दिलंय.

Published on: Jun 22, 2022 06:17 PM