Ayodhya Ram Mandir : राम मंदिराचं स्वप्न पूर्ण अन्…, बाबरीच्या ढाच्यावर चढून भगवा फडकावलेल्या कारसेवकांच्या भावना काय?
२२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचं लोकार्पण मोठ्या थाटा-माटात पार पडणार आहे. राम मंदिर उद्धाटनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात मोठा उत्साह पाहायला मिळतोय. तर रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याकरता कारसेवकांमध्ये मोठा उत्साह संचारताना पाहायला मिळत आहे. मात्र काही कारसेवकांना या लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रणच मिळालं नाही...?
मुंबई, २० जानेवारी २०२४ : अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणाचा सोहळा अवघ्या काही तासांवर आला आहे. दरम्यान, या राम मंदिराच्या निर्माणाकरता ज्या कारसेवकांनी जीवाची बाजी लावली, बाबरीच्या ढाच्यावर चढून भगवा फडकावला त्याच कारसेवकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचं लोकार्पण मोठ्या थाटा-माटात पार पडणार आहे. राम मंदिर उद्धाटनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात मोठा उत्साह पाहायला मिळतोय. तर रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याकरता कारसेवकांमध्ये मोठा उत्साह संचारताना पाहायला मिळत आहे. मात्र काही कारसेवकांना या लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रणच मिळालं नसल्याने त्यांनी खंत व्यक्त केली आहे. दुसरीकडे कारसेवावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सामना पाहायला मिळत आहे. ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये याच मुद्द्यावरून मागील अनेक दिवसांपासून वार-पलटवार सुरू आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट..