नितीन देसाई यांच्या आत्महत्येच्या ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं? ‘टीव्ही 9 मराठी’कडे एक्सक्लुझिव्ह माहिती
VIDEO | नितीन देसाई यांच्या आत्महत्येच्या रात्री नेमकं काय घडलं याची एक्सक्लुझिव्ह माहिती 'टीव्ही 9 मराठी'च्या हाती, बघा ‘त्या’ पाच-सहा तासात काय-काय घडलं?
मुंबई | 4 ऑगस्ट 2023 : ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्येच्या रात्री बाहेरगावातून मुंबईत आले होते. ते रात्री 12 वाजता मुंबई विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर ते रात्री जवळपास 2 वाजेच्या सुमारास कर्जतमधील त्यांच्या ND स्टुडिओमध्ये पोहोचले. स्टुडिओमध्ये पोहोचताच आतमध्ये असणाऱ्या एका मंदिरात त्यांनी रात्रीच्या वेळी दर्शन घेतलं. मंदिरात दर्शन घेऊन ते राहत असलेल्या त्यांच्या बंगल्यात गेले. विशेष म्हणजे या बंगल्याचे नाव सलमान हवेली आहे. या हवेलीत अभिनेता सलमान खान अनेक सिनेमांच्या शूटिंगदरम्यान राहायचा. याच हवेलीत सध्या नितीन देसाई यांच वास्तव्य होतं. नितीन देसाई आत्महत्येआधी तीन वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी गेले आणि तिथे त्यांनी पाहणी केली. आत्महत्येसाठी वापरलेली दोरी, बाजूला वर चढण्यासाठी असणारी शिडी आणि आत्महत्येचा ठिकाणी दोरीच्या साहाय्याने बनवलेला धनुष्यबाणाची प्रतिकृती हे सगळं त्यांनी आधीच बनवून ठेवलं होतं. नितीन देसाई यांची ही तयारी पाहता त्यांनी आधी आत्महत्येचा विचार केला असावा, अशी शक्यता आहे. नितीन देसाई यांनी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये पहिली ऑडिओ क्लिप प्ले केल्यावर लालबागच्या राजाला माझा शेवटचा नमस्कार अन् शेवट हा ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ असा ऑडिओ होता. नेमकं काय घडलं बघा स्पेशल रिपोर्ट…