Wine पिऊन गाडी चालवली तर? शिवम वहियाचा मुंबई पोलिसांना गंमतीदार सवाल

Wine पिऊन गाडी चालवली तर? शिवम वहियाचा मुंबई पोलिसांना गंमतीदार सवाल

| Updated on: Jan 29, 2022 | 2:55 PM

सोशल मीडियावर कधी-कधी असं काही व्हायरल होतं, की आपल्याला हसू आल्याशिवाय राहत नाही. मुंबई पोलिसांचं असंच एक ट्विट सध्या खूप व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर कधी-कधी असं काही व्हायरल होतं, की आपल्याला हसू आल्याशिवाय राहत नाही. मुंबई पोलिसांचं असंच एक ट्विट सध्या खूप व्हायरल होत आहे. नुकतंच राज्य सरकारनं नवीन ‘वाइन पॉलिसी’ मंजूर केली आहे. याअंतर्गत आता किराणा दुकान आणि सुपरमार्केट(Supr Market)मध्ये वाइन(Wine)ची खरेदी आणि विक्री करता येईल. राज्य सरकारच्या या निर्णयाला भाजपा(BJP)नं विरोध केला असतानाच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. वाइनची विक्री शेतकऱ्यांच्या हिताची असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. संजय राऊत म्हणाले, की वाइन म्हणजे दारू नाही. वाइनची विक्री वाढली तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललं आहे. भाजपा फक्त विरोध करतं पण शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही.