अजित दादांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग? थोरल्या पवारांचा डाव काय? दादांच्या राष्ट्रवादीचे ‘इतके’ नगरसेवक पवारांकडे जाणार

अजित दादांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग? थोरल्या पवारांचा डाव काय? दादांच्या राष्ट्रवादीचे ‘इतके’ नगरसेवक पवारांकडे जाणार

| Updated on: Jul 01, 2024 | 11:10 AM

बारामतीनंतर आता शरद पवारांनी अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये घेरण्याची तयारी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाचे १६ नगरसेवक हे शरद पवारांना भेटले आणि हे १६ नगरसेवक घरवापसीच्या तयारीत असल्याची चर्चा होताना दिसतेय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

अजित पवार यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार मोठा धक्का देणार असल्याच्या तयारीत आहे. कारण पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह अजित पवार यांच्या गटातील १६ नगरसेवक शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा आहेत. बारामतीनंतर आता शरद पवारांनी अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये घेरण्याची तयारी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाचे १६ नगरसेवक हे शरद पवारांना भेटले आणि हे १६ नगरसेवक घरवापसीच्या तयारीत असल्याची चर्चा होताना दिसतेय. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील १६ नगरसेवकांसह माजी आमदार, नेते विलास लांडेंही उपस्थित होते. त्यामुळे अजित पवार यांच्या गटात चलबिचल सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. तर माहितीनुसार यामागे महायुतीतील संभाव्य विधानसभेचा फॉर्म्युला कारणीभूत आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Jul 01, 2024 11:10 AM