मरीन ड्राईव्ह परिसरात अपघात टाळण्यासाठी डिव्हाडरवरचं झाडं लावणार ! BMC ची नवी शक्कल तरी काय?

मरीन ड्राईव्ह परिसरात अपघात टाळण्यासाठी डिव्हाडरवरचं झाडं लावणार ! BMC ची नवी शक्कल तरी काय?

| Updated on: May 10, 2023 | 1:24 PM

VIDEO | आता मरीन ड्राईव्ह परिसरात अपघात टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचं एक पाऊल, बघा व्हिडीओ...

मुंबई : संपूर्ण मरीन ड्राईव्ह (Marine Drive Mumbai) परिसरामध्ये नव्या पद्धतीने रस्त्याच्यामध्ये असलेल्या डिव्हायडरवर महानगरपालिका आता बॅरिकेटिंग करणार आणि त्याच ठिकाणी झाडंही लावणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये अपघाताचे प्रमाण वाढलं होतं नॉर्थ बाऊंड आणि साऊथ बाऊंड वाहतूक यामुळे विस्कळीत होत होती, झेब्रा क्रॉसिंग वरूनच लोकांनी रस्ता ओलांडावा यासाठी महानगरपालिकेने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महानगरपालिकेकडून यासाठी ८२ लाखाचं टेंडर काढण्यात आलेला आहे. लवकरच या कामाला एनसीपीए टाटा ते प्रिन्सेस फ्लायओव्हर ब्रिजपर्यंत सुरुवात केली जाणार आहे. हा प्रयोग मुंबई महानगरपालिकेने गिरगाव चौपाटी परिसरात यापूर्वीच केलेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनपा आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्यासोबत मरीन ड्राईव्ह परिसराचा आढावा घेतला होता आणि त्यावेळी नागरी सुविधा अपडेट करण्याचे आदेश दिले होते ते अंतर्गत महानगरपालिकेने हा निर्णय घेतलेला आहे.

Published on: May 10, 2023 01:24 PM