आमश्या पाडवी यांच्या ठाकरे गटातून बाहेर पडण्याचं कारण काय? काय दिली प्रतिक्रिया
ठाकरे गटाचे आमदार असलेल्या आमश्या पाडवी हे वेगळा निर्णय घेतील अशी चर्चा रंगली आहे. मात्र याबाबत त्यांनी स्वतः पुढे येत आपण कुठेही जाणार नसल्याच त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र आज आमश्या पाडवी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार
मुंबई, १७ मार्च २०२४ : नंदुरबार जिल्ह्यातील विधानपरिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा या तथ्य हिंन असल्याचे स्वतः आमश्या पाडवी यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार असलेल्या आमश्या पाडवी हे वेगळा निर्णय घेतील अशी चर्चा रंगली आहे. मात्र याबाबत त्यांनी स्वतः पुढे येत आपण कुठेही जाणार नसल्याच त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र आज आमदार आमश्या पाडवी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार असल्याचं समोर आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमश्या पाडवी यांचा शिंदे गटातील प्रवेश हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना नंदुरबारची जागा ही ठाकरे गटाला सोडण्यात यावी अशी मागणी असून, उमेदवारी आमदार आमश्या पडविना देण्याची मागणी केली जातं आहे. याबाबतही आमश्या यांनी आपण लोकसभा उमेदवारीसाठी तयार असल्याचे आपहत केले आहे. शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही भाजपाच्या उमेदवाराला विरोधात जोरदार मैदानात उतरतील अशी स्थिती निर्माण झाली आहे.