छगन भुजबळांच्या मंत्रिपदाचं काय? मंत्री करतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत?

छगन भुजबळांच्या मंत्रिपदाचं काय? मंत्री करतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत?

| Updated on: Jan 03, 2025 | 10:53 AM

आठ ते दहा दिवसांत मार्ग काढू, असं फडणवीस म्हणाल्याचे २३ डिसेंबर रोजी छगन भुजबळ यांनी सांगितले. आता दहा दिवस उलटल्यानंतर या काळात भुजबळ परदेशात होते. आता ते भारतात परतले आहेत.

आठ ते दहा दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा होईल, असं छगन भुजबळ म्हणाले होते. त्यामुळे लवकरच देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ हे चर्चा करू शकतात. त्यापूर्वी फडणवीसांनी मला मंत्री करतो असतो शब्द दिला नाही, असंही छगन भुजबळ म्हणाले. ‘तुका म्हणे उगी राहावे, जेजे होईल ते पाहावे’, अशी प्रतिक्रिया परदेशातून परतल्यावर छगन भुजबळ यांनी दिली. आठ ते दहा दिवसांत मार्ग काढू, असं फडणवीस म्हणाल्याचे २३ डिसेंबर रोजी छगन भुजबळ यांनी सांगितले. आता दहा दिवस उलटल्यानंतर या काळात भुजबळ परदेशात होते. आता ते भारतात परतले आहेत. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस काय मार्ग काढणार? असा सवाल भुजबळ यांना केला असता त्यावर चर्चा करू असं फडणवीस म्हणाले होते, मंत्री करणार असा शब्द त्यांनी दिला नव्हता, असं भुजबळांनी स्पष्ट केले. महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज होते. नाराजी जाहीर करून भुजबळ नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातून ते निघूनही गेलेत. समता परिषदेचा त्यांनी मेळावा सुद्धा घेतला. त्यानंतर २३ डिसेंबरला भुजबळ मुख्यमंत्र्यांना भेटले. या भेटीत पुन्हा भेटून चर्चा करू, असं फडणवीस म्हणाल्याचे भुजबळांनी सांगितलं होतं. अशातच विजय वडेट्टीवारांनी वेगळा दावा केलाय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Jan 03, 2025 10:53 AM