Special Report | संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणेंचं काय होणार ?
आज खरंतर नितेश राणेंच्या जामीनअर्जावर नेमका काय निर्णय होतो, हे स्पष्ट होणं अपेक्षित होतं. मात्र अखेर आता गुरुवारी या जामीनअर्जावरचा निर्णय कोर्ट जाहीर करणार आहे.
सिंधुदुर्ग : नितेश राणेंच्या जामीन अर्जावर उद्या सिंधुदुर्ग सत्र न्यायालय सुनावणी होणार आहे. आजचा युक्तिवाद संपला असून उद्या या जामीन अर्जावर निर्णय दिला जाणार आहे. संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणेंच्या यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. नितेश राणेंना जेल होणार ही बेल मिळणार, याचा निर्णय गुरुवारी जाहीर होणार आहे. मंगळवार दुपारपासून नितेश राणेंच्या जामीनअर्जावर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात युक्तिवाद सुरु आहे. मंगळवारी कोर्टाची वेळ संपल्यामुळे बुधवारी पुन्हा या युक्तिवादाला सुरुवात करण्यात आली होती. आज खरंतर नितेश राणेंच्या जामीनअर्जावर नेमका काय निर्णय होतो, हे स्पष्ट होणं अपेक्षित होतं. मात्र अखेर आता गुरुवारी या जामीनअर्जावरचा निर्णय कोर्ट जाहीर करणार आहे. सरकारी वकील आणि नितेश राणेंचे वकील या दोघांचाही युक्तिवाद आता पूर्ण झाला असून उद्या नितेश राणेंना जामीन मिळणार की अटक होणार, याबाबतचं चित्र स्पष्ट होणार आहे.