पक्षप्रमुखपदाचं काय होणार ? उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही असताना…

| Updated on: Jan 24, 2023 | 8:33 AM

मुंबई : उद्धव ठाकरे ( uddhav thacakarey ) यांच्या पक्षप्रमुख पदाची मदत संपली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रतिनिधी सभा घेण्यास अदयाप मुदत दिलेली नाही. तसेच, शिवसेना ( shivsena ) पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह यावरही अद्याप निर्णय घेतला नाही. त्यावरून विरोधक उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. अशातच काल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( shivsenapramukh balasaheb thackarey […]

मुंबई : उद्धव ठाकरे ( uddhav thacakarey ) यांच्या पक्षप्रमुख पदाची मदत संपली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रतिनिधी सभा घेण्यास अदयाप मुदत दिलेली नाही. तसेच, शिवसेना ( shivsena ) पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह यावरही अद्याप निर्णय घेतला नाही. त्यावरून विरोधक उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. अशातच काल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( shivsenapramukh balasaheb thackarey ) यांच्या जयंतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलता उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षप्रमुख पदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

तुम्ही पंतप्रधान मोदी यांची माणसे असल्याचे सांगता. तर मग, बाळासाहेब यांचे फोटोला लावून का येता? मोदी असले तरी बाळासाहेब यांच्याशिवाय महाराष्ट्र्रात मत मिळू शकत नाही हे त्यांना माहित आहे. त्यामुळे निवडणुकीत समोर यायचे असेल तर मोदी यांचे फोटो लावून या, बघू हा महाराष्ट्र कुणाच्या बाजूने आहे असे आव्हान त्यांनी भाजप आणि शिंदे गटाला दिले. तसेच, समोर उपस्थित शिवसैनिकाशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला मी पक्षप्रमुख म्हणून नको असेल तर ज्या दिवशी तुम्ही सांगाल त्यादिवशी मी खाली उतरेन असे स्पष्ट केले.

Published on: Jan 24, 2023 08:33 AM
‘त्यांना’ पायाखाली तुडवा, माझ्या आदेशाची वाट पाहू नका; बाळासाहेबांच्या विचारांच्या या बॅनरची होतेय चर्चा
वंचित आणि RPI चे कार्यकर्ते भिडले, पाहा नेमका वाद काय?