Nitesh Rane : म्यॅव म्यॅव केल तर मग चुकलं काय? आमदार नितेश राणेंचा टोला

Nitesh Rane : म्यॅव म्यॅव केल तर मग चुकलं काय? आमदार नितेश राणेंचा टोला

| Updated on: May 15, 2022 | 5:33 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बाबरी आंदोलनातील सहभागाची खिल्ली उडवली होती. यावर आमदार नितेश राणेंनी पलटवार केलाय.

मुंबई: देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी बाबरीवर पाय जरी ठेवला असता तरी त्यांच्या वजनाने मशीद पडली असती, असं विधान करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बाबरी आंदोलनातील सहभागाची खिल्ली उडवली होती. भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी त्यावर पलटवार केला आहे. जर देवेंद्रजींनी पाय ठेवला असता तर बाबरी पडली असती, तर मग हे तिथे असते तर कुठेतरी हवेनं उडून गेले असते असं आम्ही म्हणायचं का?, तुमच्या मुलाला म्यॅव म्यॅव केल तर मग चुकलं काय? असा सवाल नितेश राणे यांनी केला.

Published on: May 15, 2022 05:32 PM